तुम्हीही, व्हॉटसअप मॅसेजनंतर 'पूर्णविराम' वापरता?

मोबाईलवर ऑनलाईन मॅसेजिंग सुविधा  'व्हॉटसअप'नं उपलब्ध करून दिली आणि तरुणाईमध्ये हे फॅड भलतंच आकर्षक ठरलं. पण, तुम्हालाही मॅसेजमधूनच अनेक महत्त्वाच्या गोष्टी व्यक्त करण्याची सवय लागली असेल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात घ्याव्याच लागतील.

Updated: Dec 15, 2015, 04:54 PM IST
तुम्हीही, व्हॉटसअप मॅसेजनंतर 'पूर्णविराम' वापरता? title=

मुंबई : मोबाईलवर ऑनलाईन मॅसेजिंग सुविधा  'व्हॉटसअप'नं उपलब्ध करून दिली आणि तरुणाईमध्ये हे फॅड भलतंच आकर्षक ठरलं. पण, तुम्हालाही मॅसेजमधूनच अनेक महत्त्वाच्या गोष्टी व्यक्त करण्याची सवय लागली असेल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात घ्याव्याच लागतील.

तुम्हालाही मॅसेजच्या प्रत्येक वाक्यानंतर पूर्णविराम वापरण्याची सवय असेल... तर यापुढे ही सवय बदलावी लागेल. होय, कारण नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, एका ओळीच्याही प्रत्येक वाक्यानंतर विरामचिन्हे वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामाणिकपणाची कमतरता आढळते.


चिन्ह वापरताना सावधान!

म्हणजेच, 'होय.' किंवा 'नाही.' अशा प्रकारची उत्तरे देऊन त्यापुढे पूर्णविराम वापरणाऱ्या व्यक्ती काही अप्रामाणिक असतात, असा हा अभ्यास सांगतो. पण, हाच नियम मात्र हातानं केलेल्या लिखानाला लागू होत नाही.

तर याच्या अगदी विरुद्ध म्हणजे, आपल्या वाक्यांत उद्गारवाचक चिन्ह वापणाऱ्या व्यक्ती मात्र आपल्या शब्दांप्रती प्रामाणिक आढळल्या. या अभ्यासासाठी १२६ जणांच्या मॅसेजचा अभ्यास केला गेला.