... तुमचा हा फोटो कधीही सोशल वेबसाईटवर शेअर करू नका!

परदेशी फिरायला जाणारे तर अनेकदा आपल्या बोर्डींग पासचाही फोटो सोशल वेबसाईटवर शेअर करतात. पण, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

Updated: Dec 31, 2015, 04:52 PM IST
... तुमचा हा फोटो कधीही सोशल वेबसाईटवर शेअर करू नका! title=

मुंबई : आपण बाहेर कुठे फिरायला जात असू तर लगेचच तसं सिद्ध करणाऱ्या पुराव्यांचा फोटो सोशल वेबसाईटवर आपल्या शेअर करण्याची खुमखुमी अनेकांना असते... परदेशी फिरायला जाणारे तर अनेकदा आपल्या बोर्डींग पासचाही फोटो सोशल वेबसाईटवर शेअर करतात. पण, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 

आपल्या बोर्डींग पासवर असलेल्या बारकोडवरून आपल्याबद्दल मोठी माहिती हॅकर्सना उपलब्ध होऊ शकते. इंटरनेटवर या 'बारकोड'वरून माहिती कशी मिळवायची, हा बारकोड डी-कोड कसा करायचा हे सांगणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. 

बोर्डींग पासवरच्या या बारकोडवरून पॅसेंजरचं नाव, तो किती वेळा विमान प्रवास करतो, भविष्यात तो कधी आणि कुठे विमानानं जाणार आहे ही माहिती मिळतेच... शिवाय इतर वैयक्तिक माहिती मिळू शकते. या बारकोडमध्ये पॅसेंजरचं शेवटच्या नावाचाही समावेश असतो. 

तर मग लक्षात ठेवा तुमच्या बोर्डींग पासवर एअरलाईन तिकीट नंबर, रेकॉर्ड लोकेटर आणि बारकोड असतो... तो कुणाशीही शेअर न करणंच चांगलं.... इतकंच नाही तर विमान प्रवास केल्यानंतर आपला पास कुठेही फेकून देण्याऐवजी त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. अन्यथा तुम्ही स्वत:ला धोक्यात टाकाल.