विकी नियरबाय अॅपनं मिळवा अनोळखी ठिकाणांची माहिती

एखाद्या ठिकाणाची माहिती मिळवण्याकरता, विकिपीडियानं विकि नीअरबाय हे नवं ऍप विकसित केलं आहे. 

Updated: Jul 3, 2016, 05:08 PM IST
विकी नियरबाय अॅपनं मिळवा अनोळखी ठिकाणांची माहिती  title=

मुंबई : एखाद्या ठिकाणाची माहिती मिळवण्याकरता, विकिपीडियानं विकि नीअरबाय हे नवं ऍप विकसित केलं आहे. प्रवासात किंवा एखाद्या अपरिचित ठिकाणची माहिती गुगल सर्चद्वारे मिळवण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असतो. ही माहिती अद्ययावत रुपात मिळण्याकरता, विकिपीडियानं विकि नीअरबाय हे ऍप विकसित केलं आहे. 

आता थेट नकाशावरच एका क्लिकवर ही माहिती, मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकणार आहे. याकरता देशातल्या विकिपीडियानं विकि-नीअरबाय’ हे ऍप विकसित केलं आहे. त्यानुसार एखाद्या माहितीवर क्लिक केलं, तर ती माहिती अॅनिमेशन रूपात मिळू शकणार आहे.