केटी पेरीने बनवला नवा रेकॉर्ड, ट्विटर फॉलोअर्सची संख्या ९ कोटींवर

पॉप स्टार केटी पेरीने नवा रेकॉर्ड बनवत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तीचा मान मिळवलाय. ट्विटरवर ३१ वर्षीय गायिकेचे नऊ कोटीहून अधिक फॉलोअर्स झालेत. 

Updated: Jul 3, 2016, 12:20 PM IST
केटी पेरीने बनवला नवा रेकॉर्ड, ट्विटर फॉलोअर्सची संख्या ९ कोटींवर title=

नवी दिल्ली : पॉप स्टार केटी पेरीने नवा रेकॉर्ड बनवत मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तीचा मान मिळवलाय. ट्विटरवर ३१ वर्षीय गायिकेचे नऊ कोटीहून अधिक फॉलोअर्स झालेत. 

याबाबत खुद्द साईटने ट्वीट करुन तिला हे सांगितलेय. हा पार्टी टाईम आहे केटी पेरी. तुमच्या फॉलोअर्सची संख्या नऊ कोटी झालीये. 

पॉप स्टार जस्टिन बीबरच्या फॉलोअर्सची संख्या आठ कोटी ३९ लाख इतकी आहे. त्यामुळे ती केटीच्या जास्त मागे नाही.