विंडोज मोबाईलवर आता अॅंड्रॉईड, आयओएस सिस्टीम

स्मार्टफोनसाठी एक चांगली बातमी. आता विंडोज स्टिस्टीमवर अॅंड्रॉईड, आयओएस सुविधा मिळणार आहे.

Updated: May 5, 2015, 03:18 PM IST
विंडोज मोबाईलवर आता अॅंड्रॉईड, आयओएस सिस्टीम title=

वॉशिंग्टन : स्मार्टफोनसाठी एक चांगली बातमी. आता विंडोज स्टिस्टीमवर अॅंड्रॉईड, आयओएस सुविधा मिळणार आहे.

जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचा नविन विंडोज १० ओएस स्मार्टफोन धम्माल उडवून देणार आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे युजर्स आता अॅंड्रॉईड, आयओएसचा वापर करु शकणार आहे. विंडोज १० वर अॅंड्रॉईड, आयओएस वर चालणारे अॅप्स चालणार आहेत. कंपनीचा दावा आहे, मार्केटमध्ये फोनला अधिक लोकप्रियता मिळेल.

मायक्रोसॉफ्टचे स्मार्टफोन कमी अॅप्समुळे जास्त लोकप्रिय नसतात. त्यामुळे आपली चूक सुधण्यासाठी अॅंड्रॉईड, आयओएस ही प्रणाली आपल्या फोनवर देणार आहे. त्यामुळे विंडोजबरोबर जास्त अॅप्स ग्राहकांना मिळणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.