इंटरनेटशिवाय हाईकवरुन पाठवा मेसेज

हल्ली इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवाल्यांचे पान हलत नाही. नेट नसेल तर त्या स्मार्टफोनचा वापर शून्य. इन्स्टंट मेसेजिंग चॅटसाठी मोबाईल डेटा, वायफाय गरजेचे असते. मात्र हाईक मेसेंजर अॅपवरुन इंटरनेटशिवाय तु्म्ही मेसेज पाठवू शकणार आहात. 

Updated: Dec 8, 2015, 12:30 PM IST
इंटरनेटशिवाय हाईकवरुन पाठवा मेसेज title=

नवी दिल्ली : हल्ली इंटरनेटशिवाय स्मार्टफोनवाल्यांचे पान हलत नाही. नेट नसेल तर त्या स्मार्टफोनचा वापर शून्य. इन्स्टंट मेसेजिंग चॅटसाठी मोबाईल डेटा, वायफाय गरजेचे असते. मात्र हाईक मेसेंजर अॅपवरुन इंटरनेटशिवाय तु्म्ही मेसेज पाठवू शकणार आहात. 

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म हाईकने काही दिवसांपूर्वी हाईक डायरेक्ट हे नवे फीचर लाँच केले. यात इंटरनेट कनेक्शशिवाय मेसेज करणे शक्य होणार आहे. या फीचरचा वापर करुन तुम्ही वायफाय अथवा मोबाईल डाटा सुरु नसतानाही तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेज करु शकता. तुम्ही यात फोटोज, स्टिकर्स, फाईल्सही पाठवू शकता. ७० एमबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही १० सेकंदात पाठवू शकता.

व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी हाईक हे अॅप दोन वर्षांपू्र्वी स्मार्टफोनवर दाखल झाले. या अॅपचे ७० मिलियनहून अधिक यूजर्स झाले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.