नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पोहोचल्यानंतर दोन टिक दिसतात. जर तो मेसेज समोरच्या व्यक्तीने पाहिला तर त्या टिक निळ्या रंगाच्या होतात. तुम्ही मेसेज वाचलाय की समोरच्या व्यक्तीला समजू नये आणि ब्लू टिक मार्क दिसले नाही पाहिजे तर व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. त्यात ही सुविधा देण्यात आलीय. यूजर्स ही ब्लूक टिक डिसेबल करु शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचलाय की नाही हे देखील कळणार नाही.
सर्वात आधी व्हॉट्सअॅपचे 2.11.444 WhatsApp apk हे व्हर्जन डाऊनलोड करा. गुगल प्लेद्वारे इन्स्टॉल करण्यात आलेल्या या अॅपला इनेबल करण्यासाठी अँड्रॉईड फोनमध्ये Settings > Security > Check Unknown sources मध्ये जा. त्यानंतर अँड्रॉईड फोनमध्ये apk ओपन करा. यामुळे व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल होईल. हे अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर read receipts अथवा ब्लू टिक मार्क फीचर खालीलप्रकारे डिसेबल करा
व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर तीन डॉट असलेल्या ठिकाणी टॅप करा
आता Settings > Account > Privacy मध्ये जा
त्यानंतर Read receipts ला अनचेक करा
यामुळे व्हॉट्सअॅपमधील ब्लू टिक डिसेबल होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.