जगातील पहिली सौर बॅटरी, हवा आणि प्रकाशावर होणार चार्ज

अमेरिकेच्या शास्त्रज्ञानांनी जगातील पहिली सौर बॅटरी विकसित केली आहे. हवा आणि प्रकाशच्या माध्यमातूनन ही बॅटरी रिचार्ज होईल.

Updated: Oct 6, 2014, 08:34 AM IST
 जगातील पहिली सौर बॅटरी, हवा आणि प्रकाशावर होणार चार्ज

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या शास्त्रज्ञानांनी जगातील पहिली सौर बॅटरी विकसित केली आहे. हवा आणि प्रकाशच्या माध्यमातूनन ही बॅटरी रिचार्ज होईल.

ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी एका उपकरणात सोलर सेल आणि एक बॅटरी जोडली. याच्यामाध्यमातून सौर बॅटरी तयार केली आहे.

शास्त्रज्ञानांनी एक सोलर पॅनेल तयार केले. याच्यामाध्यमातून हवा बॅटरीमध्ये प्रवेश करील. त्यानंतर एक विशेष प्रक्रिया झाल्यानंतर सोलर पॅनल आणि बॅटरी यांच्यामध्ये आदान-प्रदान होते. या सौर बॅटरीच्या उत्पादनासाठी परवाना घेतला जाणार आहे. यातून अपारंपारिक ऊर्जा खर्च कमी करण्यास मदत होईल.

या शोधामुळे सौर ऊर्जेची कार्यक्षमता वाढली जाईल. सौर सेलपासून स्वतंत्र बॅटरीमुळे ऊर्जा वाचवण्यासाठी  मतद होईल.. साधारणपणे 80 टक्के इलेक्ट्रॉन बॅटरीमध्ये टिकेल. इलेक्ट्रॉन 100 टक्के बॅटरी नवीन डिझाइन केली जाऊ शकते. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.