जगातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक

सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच भारतात आणि अमेरिकेमध्ये लाँच होत आहे.

Updated: Jan 28, 2016, 11:16 PM IST
जगातली सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक title=

मुंबई: सगळ्यात जास्त मायलेज देणारी बाईक लवकरच भारतात आणि अमेरिकेमध्ये लाँच होत आहे. झिरो एस असं या बाईकचं नाव असून, ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक 240 किलोमिटरपर्यंत मायलेज देऊ शकते, तसंच ताशी 140 किलोमिटरच्या स्पीडनं ही बाईक पळू शकते. ही बाईक चार्ज करायला फक्त 2 तास लागतात. 

झिरो एस झेडएफ 9.8, झिरो एस झेडएफ 13.0 आणि झिरो एस झेडएफ 13.0+ पॉवर टँक या तीन प्रकारांमध्ये ही बाईक उपलब्ध होणार आहे. 

या तिन्ही प्रकारच्या बाईकमध्ये क्लचलेस डायरेक्टर ड्राईव्ह ट्रान्समिशन देण्यात आलं आहे, त्यामुळे शहरातल्या ट्रॅफिक आणि छोट्या गल्ल्यांमधून ही बाईक चालवणं सोप होणार आहे. तसंच चांगल्या एअर सस्पेंशनमुळे रस्त्याच्या खड्ड्यांमध्येही ही बाईक चालवताना फारसा त्रास होणार नाही.