तुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय!

तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Updated: Mar 5, 2015, 02:06 PM IST
तुमचं फेसबुक अकाऊंट 'पासवर्ड'शिवाय दुसरंच कुणीतरी हाताळतंय! title=

नवी दिल्ली : तुमच्या फेसबुक अकाऊंटवर 'साईन इन' करण्यासाठी काही जणांना पासवर्डची आवश्यकता नाही... ते तुमचं अकाऊंट सहज चाळू शकतात... याची तुम्हाला कल्पना आहे का? 

होय, फेसबुकमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना पासवर्डशिवाय त्यांचं फेसबुक अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. 

'वेंटरबीट' या वेबसाईटनुसार, फेसबुकनं हे स्पष्ट केलंय की ही अनेक स्तरांची, उपभोक्त्यांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेली सहयोग प्रणाली आहे. तसंच, कंपनीच्या विश्वासाचं आणि अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नोकरीतून डच्चू दिला जातो.

फेसबुकच्या प्रवक्त्याचा दाखला देत 'वेंटरबीट'नं, कोणाचंही फेसबुक अकाऊंट खोलण्याची स्वातंत्र्य अनेक स्तरांवर दिली जाते. तसंच काही निर्धारित कार्यांसाठी ही सुविधा दिली जाते. आपल्या कामाशी निगडीत कामासाठी कर्मचाऱ्यांना कोणत्याही फेसबुक युझरचं अकाऊंट उघडण्याची सुविधा आहे. तसंच केवळ त्याच कार्यासाठी सूचना त्याला दिल्या जातात.

संदिग्ध व्यवहारांच्या चौकशीसाठी या पद्धतीच्या दोन प्रणाली स्थापित करण्यता आल्यात. त्या प्रत्येक आठवड्याचा अहवाल तयार करतात. दोन स्वतंत्र सुरक्षा दल या अहवालाची पुनसर्मिक्षा करतात. अयोग्य व्यवहार किंवा नियमांचं उल्लंघन आढळल्यास अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ नोकरीतून कमी केलं जातं, असंही यात म्हटलं गेलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.