अवघ्या 3,777 रुपयांत झेनचा सिनेमॅक्स 2 प्लस लाँच

भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी झेनने नवा स्वस्तात मस्त असा सिनेमॅक्स 2 प्लस हा स्मार्टफोन लाँच केलाय. 

Updated: Oct 29, 2016, 02:13 PM IST
अवघ्या 3,777 रुपयांत झेनचा सिनेमॅक्स 2 प्लस लाँच title=

मुंबई : भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी झेनने नवा स्वस्तात मस्त असा सिनेमॅक्स 2 प्लस हा स्मार्टफोन लाँच केलाय. 

शॉपक्लूस या ई-कॉमर्स वेबसाईटवर हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने अवघी 3,777 रुपये इतकी ठेवलीये.

स्मार्टफोनचे फीचर्स

5.5 इंचाचा डिस्प्ले
1.3 गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी
32 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा
अँड्रॉईड 5.1 लॉलीपॉप 
5 मेगापिक्सेल रेयर आणि 3.2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
किंमत - 3,777 रुपये