ऋषी देसाई
शोले या हिंदी चित्रपटातला संवाद प्रत्येकाला ठाऊक आहे.. रामगडमध्ये जावून मार खालेल्या त्या कालिया आणि सांबाची आज दया येतेय. ते तर केवळ सांगकामे पगारदार गुंड होते.. पण आज मात्र दुर्दैवाने ही वेळ आज आपल्या जनतेवर आली आहे. गेले दोन महिने महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांना बसणारी दुष्काळाची झळ आता तीव्र होऊ लागलीय.. मात्र, मंत्रालयच्या वातानुकूलित कक्षात ही झळ काल परवा बसलीय.. तिही खिडकीची तावदानं कशानं वाजताय म्हणून पाहिल्यानंतर.. खिडकी उघडल्यानंतर डोळे उघडल्याचा साक्षात्कार झालाय.
दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडे एकूण २२८१ कोटींची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती. यापैकी दुष्काळी सिंचनासाठी १२०० कोटी तर तातडीच्या उपाययोजनांसाठी १५०० कोटींच्या निधीची मागणी राज्यानं केंद्राकडं केली होती. राज्यातली ६२०१ खरीपाची आणि १५५२ रब्बीची गावं दुष्काळग्रस्त असल्याची आकडेवारी सरकार दरबारी आहे. केंद्राच्या आपत्तकालीन फंडातून मदत मागण्याचा प्रत्येक राज्याला हक्क आहे. त्यानुसारच महाराष्ट्रानं मदतीचं आवाहन केंद्र सरकारला केल होते. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तूर्त तरी फोल ठरली आहे.
दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक झाली. मात्र पंतप्रधानांनी ठोस, असे आश्वासन किंवा मदतीचे पॅकेज जाहीर केलं नाही. मात्र त्री-सदस्यीय समितीची स्थापन करण्याचा निर्णय झाला. कृषीमंत्री शरद पवार, संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची ही समिती असेल. ही समिती दुष्काळाचा आढावा घेऊन मग पॅकेज बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळं सध्यातरी राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला नाही. विशेष म्हणजे पाच लाख टन धान्याची तातडीची मागणीही केली होती. देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्राचे असूनही त्याबाबतही केंद्रानं कोणताही निर्णय घेतलेला नाही. मदत नाही किमानपक्षी धान्य तरी दिलं असत ना तरी दान पावलं म्हणत फिरलो असतो.. पण मिळाला तो केवळ भोपळा!
आता जूनमध्ये (किंवा जूनपर्यंत असही म्हणू) बहुचर्चित कमिटी येईल.. त्यावेळी पावसाला सुरुवात झालेली असेल कदाचित.. कारण आमचा पाऊसही हवा तेव्हा प़डत नसल्यामुळे कमिटी येण्याच्या तोंडावर आठवणीन अवकाळी हजेरी लावेल.. सुजलाम सुफलाम दुष्काळप्रदेश पाहून कमिटी गरज नाही, असा शेरा मारून निघून जाईल... प्रश्न उरतो मग आमची चूक काय? वाईट मदत मिळाल्याचं नाही वाटत.. वाईट वाटते ती फक्त एक बातमी वाचून.. पश्चिम बं