रोहित गोळे, कॉपी रायटर, झी मीडिया
सहज किती तू बोलून गेलीस, झाले गेले विसरायाचे...
झुरणे आता, झुलणे आता, झोले सारे विसरायाचे...
कधी भेटलो, कधी पेटलो, कधी दाटलो विसरायाचे...
आठवीत मी बसतो आता काय काय मज विसरायाचे...
(कवी - वलय मुळगुंद)
‘ती’ आणि ‘तो’ आपल्या जीवनात हे नातं नेहमीच असतं... असेच ‘ती’ आणि ‘तो’ होते तरी कसे... आहेत तरी कसे? कॉलेज म्हंटलं की, कुणासाठी तरी नजर भिरभिरत असते. आपलं माणूस शोधण्यासाठी नजर कावरी बावरी झालेली असते. अशाच एका कॉलेजमधल्या ‘ती’ आणि ‘तो’ ची ही कथा...
तो... कॉलेजमध्ये आधीच उशीरा दाखल झालेला... दोन ते तीन दिवस काय चाललयं हेच कळायला त्याला मार्ग नव्हता... मग असाच काही दिवस मख्ख सारखा यायचा बसायचा आणि जायचा... हा पण वर्गात त्याची नजर सतत कोणाला तरी शोधीत होती... कोणाला... हे त्याला ही माहित नव्हतं... आणि अखेर चार पाच दिवसांनी त्याची नजर स्थिरावली... ‘ती’च्या अवखळ हसण्याने... तिचं हसणं म्हणजे जणू काही प्राजक्तांच्या फुलांचा सडाच... आणि त्या हसण्यात तो स्वत:ला कधी हरवून बसला हे त्याचं त्यालाही कळलं नाही... तिचाकडे पाहतचं राहिला... आणि हसता हसता... तिचंही त्याच्याकडे लक्ष गेलं... ‘कोण हा’...? अतिशहाणाच वाटतोय जरा... असच तिच्याही मनात येऊन गेलं असणार... काही वेळाने तोही भानावर आला. वर्गात आपण एकटेच नाहीयेत याची त्याला जाणीव झाली. पण तरीही सबंधं लेक्चर तिच्याकडे चोरून पाहणं काही त्याने सोडलं नाही. तीपण मध्येच एखादा कटाक्ष टाकीत होती. आणि तो पुन्हा पुन्हा मोहरून जात होता....
दोघांची ओळख व्हायला फारसा वेळ काही लागला नाही. वर्गात तरी मोजकीचं मुलं... त्यामुळे सगळ्यांशी ओळख करून घेणं तसं सोपं होतं. मग एके दिवशी तिचा त्याला फोन आला... आणि मग तो मात्र चांगलाच उडाला... तिने तिच्या मृदू.. आणि गोड आवाजात त्याचं नाव घेतलं. दोन क्षण त्यालाही कळलं नाही. हे काय घडलं. मग मात्र स्वत:ला सावरत तिला फोन करण्याचं कारण विचारलं. म्हणे तिचं काही तरी कामं होतं. कॉलेज संदर्भात... मग काय हा मदत करण्यासाठी एका पायावर तयारच होता. हळूहळू.. दोघांमध्ये फार चांगली मैत्री झाली.. तिच्याशिवाय त्याचं पान हलंत नव्हतं. ती देखील तो कॉलेजला आला नाही की अस्वस्थ व्हायची. आता तर वर्गात दोघंही शेजारीच बसायचे. ती त्याला नेहमी म्हणायची अभ्यासात लक्ष दे... आणि तो तिला नेहमी म्हणायचा. ‘तू आहेस ना... मग मला कसली काळजी...’
दिवसामागून दिवस सरत होते. तो... तसा फार संवेदनशील होता. सगळ्यांमध्ये स्वत:ला हरवून जाणारा होता. मित्र-मैत्रिणी सारं त्याच्यासाठी खूप काही वाटायचं.. तिला सुद्धा मित्र-मैत्रीणी फार हवेहवेसे वाटायचे... पण ती (प्राक्ट्रिकल) होती. ती नेहमी त्याला म्हणायची.. इतका सगळ्यांमध्ये अडकू नकोस... त्रास होईल. आणि तो नेहमीच हसत हसत म्हणायचा. ‘मी असाच आहे गं...!’ त्याला कोणी काही बोललं की, ती मात्र चिडायची... त्याला नेहमी समजवायची.. म्हणायची.. 'असा नको रे वागूस... असा कसा रे तू... एके दिवशी तुला फार मोठं झालेलं पाहायचंय.. सावर स्वत:ला नको अडकूस साऱ्यांच्या बंधनात...' पण तो होताच जरासा मुडी... पण मनाने निर्मळ होता.. छक्के-पंजे कधीच नाही कळायचे त्याला. ती मात्र नेहमीच त्याच्या पाठीशी उभी असायची ठामपणे.... आणि म्हणूनच ती त्याला नेहमीच आवडायची.. तिच्यासाठी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करीत होता.
तिला देखील त्याच्याशिवाय करमायचं नाही. सारं काही मनातलं त्याला सांगायची. तो सुद्धा साऱ्या गोष्टी मनात ठेवायचा. ती तशी जराशी उथळच... पण तोही तिला हळूहळू ओळखू लागला होता. तिच्या मनात काही जरी असलं तरी आवाजावरूनच ओळखायचा. मग ती पण काही आडपडदा न ठेवता सारं काही सांगायची.. हळूहळू या नात्यात एक ओढ निर्माण होत गेली. साहजिकच ती होणारच होती. पण आता मात्र तो जास्तच तिच्याभोवती घुटमळायचा. वर्गातही साऱ्यांनाच ते दिसायचं. सारेजण तिलाही चिडवायचे. त्यालाही चिडवायचे. पण त्याच्या मनाची पूर्ण तयारी झालीच नव्हती. मग तो इतरांवर चिडायचा. ती मात्र नेहमीच शांत असायची. त्याला समजवायची. 'असू दे रे...' असं म्हणून छानसं हसली की मग आपसूकच त्याचाही राग शांत व्हायचा. कॉलेजचे काही दिवसच शिल्लक राहिले आता मात्र तो चांगलाच अस्वस्थ झाला. काय करावं तिला विचारावं का.. काय वाटेल तिला... इतकी चांगली मैत्रीण... असं विचारल्याने काय