`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..? रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 7, 2014, 04:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सुनील घुमे

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..? रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण... आताही `ती` शेजारीच बसली होती. बायको म्हणून... आणि आमच्या या `टाइमपास`ला आलेलं गोड `फळ` देखील आमच्यासोबत होतं...
त्यामुळे सिनेमाशी एकदम कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. किंबहुना आपलीच स्टोरी पडद्यावर दाखवत नाहीत ना, अशीही शंका आली. `टाइमपास`मधले अनेक प्रसंग चक्क आमच्याही आयुष्यात घडलेले होते. अगदी सहज येता जाता, कुणालाही कळणार नाही अशा बेताने केवळ खाणाखुणांनी साधलेला संवाद... केवळ हातवारे करून सांगितल्या जाणा-या भावना... शब्देविण संवादू की काय म्हणतात ना, तेच ते...
साईबाबा हा देखील कॉमन फॅक्टर... सिनेमातला साईबाबांच्या गाण्यांचा फिल्मीपणा सोडला, तर त्या काळात आपणही बाबांच्या पुढ्यात उभं राहून जे मागायचो, तेच दगडूच्या तोंडून ऐकायला मिळालं..
आमची `प्राजक्ता`ही तेव्हा तश्शीच होती... काजू कतली आणि प्राजक्ता पतली... ती कॉलेजमध्ये जाऊ लागली, तेव्हाच मी प्रपोज केलं होतं. न जाणो, आपल्या आधी इतर कुणी नंबर लावला तर... या भीतीनं काळीज धडधडायचं... थेट प्रपोज करण्याची हिंमतच व्हायची नाही. मग आडून आडून विचारायचो... एका वाक्यात उत्तर देशील का, असा भुंगा तिच्या मागे कित्येक दिवस लावला होता. मग एकदा सगळी हिंमत एकवटून तिला विचारलं... तर तिनंही `प्रतिक्षा...` करायला सांगितलं. (सिनेमातली प्राजक्ताही दगडूला लायब्ररीत प्रतिक्षा नावाचं पुस्तक दाखवते...) माझ्या एका वाक्याच्या प्रश्नाला तिनं एका वाक्यात कधीच सरळ उत्तर दिलं नाही. त्यामुळं तिला हो म्हणायचंय की, नाही म्हणायचंय, तेच कळत नव्हतं. माझाही तेव्हा दगडूच झाला होता.. सिनेमात दगडूनं फोटो मागितल्यावर प्राजक्ता आपल्या हॉल तिकीटवरचा फोटो काढून त्याला देते... आमच्या प्राजक्तानंही २० वर्षांपूर्वी तेच केलं होतं. तिचा हॉल तिकीटवरचा तो काळ्या ड्रेसमधला फोटो कितीतरी वर्षं मी पाकिटात जपून ठेवला होता.... 143 वगैरे आमच्या काळात नव्हतं... तेव्हा इलू इलू असायचं. इलू का मतलब आय एल यू.. आय लव्ह यू...
तिच्या `प्रतिक्षा` करायला सांगण्याला अनेक कारणं होती. एक म्हणजे आमचं वय खूपच लहान होतं... आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या अगदी शेजारी शेजारी राहत होतो... एकदम सख्खे शेजारी. दोघांच्या घरामध्ये होती ती फक्त एक `दिवार`... पण ती दिवार पार करणं, म्हणजे महामुश्किल काम होतं.

यह इश्क नही आसाँ
बस इतना समझ ले
एक आग का दरियाँ है
और डुब के जाना है...

याची कल्पना त्याकाळी अजिबातच नव्हती. अगदी अल्लड वयातलं ते प्रेम... नोकरी, घर, संसार असा हिशेबीपणा त्यात अजिबातच नव्हता. तेवढा विचार करण्याची बुद्धी तरी कुठं होती..? होत्या त्या निव्वळ भावना... मला ती आवडते आणि तिला मी आवडतो.. बस्सं एवढंच. पुढं काय... काहीच माहित नव्हतं... सकाळी एकत्र कॉलेजला जाणं, दुपारी एकत्र घरी येणं, मग संध्याकाळी क्लासच्या बहाण्यानं पुन्हा एकदा एकमेकांना भेटणं... असं दिवसरात्र आम्ही सोबतच असायचो...
मग दगडू आणि प्राजक्ताच्या जे झालं, तेच आमच्याही बाबतीत घडलं...
तुम लाख छुपाओ प्यार मगर,
दुनिया को पता चल जाएगा...

हे खरं ठरलं... आणि आमच्या दोघांच्याही घरात आभाळ कोसळलं... मूर्खपणा, बालिशपणा, थिल्लरपणा, वासना... अगदी नको नको ती नावं आमच्या नात्याला ठेवण्यात आली. तेव्हा जवळच्या नातेवाईकांचा, आईवडिलांचा केवढा राग यायचा... प्रत्येकामध्ये `वैभव मांगले` जाणवायचा... सख्खे शेजारी, आता पक्के वैरी झाले होते.. आपल्या उदात्त प्रेमाला हे किती हिणकस समजतात, अपवित्र समजतात, ख-या प्रेमाची कदरच कशी कुणाला नाही, प्रेमी जीवांवर अन्याय करण्यातच सर्वांना कसा आसूरी आनंद मिळतो, याचे अनुभव घेत होतो... आमच्या दोघांवर बंधनं घालण्यात आली. आईवडिलांच्या भीतीनं बोलण्याची-भेटण्याची चोरी झाली. टाइमपासप्रमाणं माझ्या `प्राजक्ता`चे आईवडिल घर सोडून गेले नाहीत, पण माझ्या `प्राजक्ता`ला नर्सिंगच्या शिक्षणासाठी हॉ