इस्राइल
जगात दूध उत्पादनामध्ये इस्त्रायल देश अग्रेसर आहे तर दूध उत्पादनातील आधुनिक यंत्रणेच्या संशोधनात अफिमिल्क ही संस्था अग्रेसर आहे. या संस्थेतील इलिपिलीस या शेतकऱ्याने १९७६मध्ये मिल्क मिटरची निर्मिती करुन सर्वांना चकित केलं. त्यावेळी हे संशोधन १० वर्ष पुढचं होतं आज बदलत्या युगात या संस्थेचं संशोधन २५ वर्ष पुढं जाऊन ठेपलंय.
इस्त्रायलमधली ही आहे अफिमिल्क संशोधनाची कार्यशाळा...याच संस्थेनं पारंपरिक दुध व्यवस्थापनेत आधुनिक बदल घडवलाय..१९७६ साली पहिलं मिल्क मीटर विकसीत करुन १० वर्ष पुढील संशोधन त्यांनी जगासमोर ठेवलं.. .इलेक्ट्रॉनिक मिल्क मीटरमुळे गोठ्यातील दुधाची मोजणी यांत्रिक पद्धतीने सुलभ झाली. दुधाची हातळणी कमी झाल्याने गोठ्यातील कामाला वेग आला. परिणामी गायींच्या संख्येत शेकड्याने वाढ झाली आणि इस्त्रायलमधल्या दुध व्यवसायीकांनी उत्पादनवाढीत गरुड भरारी घेतली. जगभरात इलेक्ट्रॉनिक मिल्क मीटरचा लाभ १ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी करुन घेतलाय..पुढे अफिमिल्क या संस्थेनं पीडोमिटरचं संशोधन करुन जगभरातल्या शेतकऱ्यांना गायींचा आरोग्य स्थिती सांगणारी यंत्रणा विकसित केली.
पीडोमिटरमुळे गायींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आरोग्यवर परिणामकरणारे अनेक घटांचा त्यामुळे अभ्यास करता आला. या उपकरणामुळे गायींचं आरोग्य सुदृढ ठेवण्यात मदत झाली. गायींना आजार होण्याआधीचं निदान शक्य झालं. उलट गायींना आजारी पडण्याआधीचं प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आली. आजवर ५० देशांमध्ये १ कोटी पिडोमिटरचा लाभ त्यामुळे शेतकऱ्यांनी करुन घेतलाय.. यानंतर १९८४ मध्ये अफिमिल्कने गोठ्यांना संगणक प्रणाली जोडली. सगळी काम संगणका मार्फत केली जाऊ लागली. या नव्या शोधामुळे गायींचा आहार, प्रजननक्षमता, अनुवंशिकता, खाद्यव्यवस्थापन, लसीकरण आणि वासरांच्या संगोपनातील बारीक घटकांची नोंद ठेवण सोप झालं. वर्षभराच्या नोंदींचा तक्ताचा कंम्पूयटरवर अचूक दिसू लागला..यामुळे गोठ्यातील गायींच्या आरोग्याची आणि उत्पादकतेचं विशेलेषण करण सहज शक्य झालं...एवढंचं नाहीतर गायींची संपूर्ण माहितीच्या एकत्रीकरणामुळे गायींच्या उत्पन्नाच्या संभाव्य बाबी सहज लक्षात येऊ लागल्या. प्रत्येक जनावरांची नोंद व्यक्तीगत पातळीवर ठेवण्यात आल्यानं दुध वाढीचं आणि घटण्याची कारणं ठळकपणे लक्षात आली आणि दुध उत्पादनवाढीची दिशा स्पष्ट होत गेली. परिणामी उत्पन्न वाढीचा वेग दुप्पटीने वाढला. ही महागडी यंत्रणा जगभरातील ३००० लोकांनी आजवर वापरली असून याची मागणी सतत वाढतेय. अफिमिल्क मधील नव्या पिढीनं या सर्व यंत्रणेत पूर्नविकसीत करुन दर्जा तर विकसीत केलाच तसेच नवं संशोधनही पुढं आणलंय...
अफीलो २०००, अफीलाईट प्लस आणि अफिफ्री या नव्या संशोधनामुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या...कारण वेळेत दुध काढणे,दुधाचा प्रवाह, दुधाची वेगाने हातळणी आणि गोठ्यातील कार्यचं अवलोकन यासर्व गोष्टींवर एकाच वेळी नियंत्रण करता येऊ लागलं. अफीवे या संगणकप्रणालीमुळे गायीचं ऑटोमॅटीक वजन होउ लागलं. अफीमिलकचं संशोधन एवढ्यावरचं थांबलं नाही तर त्यांनी दुग्धोउत्पादनातील अनेक संभाव्य बाजू लक्षात घेऊन दुध उत्पादन वाढीसाठी नवं नवं संशोधन करुन अफिमिल्कनं जगाला थक्क केलंय..