बॉलिवूडच्या सिनेमांच्या उलाढालीच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणांना अंत नाही. रोज एक नवा उच्चांक हिंदी सिनेमा नोंदवत असतात मग तो बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत असो किंवा सॅटेलाईट राईटसच्या बाबतीत असो. कलाकाराच्या मानधनांनी आसमाँ की बुलंदी केंव्हाच गाठली आहे. आता अग्रिपथ चे टीव्ही हक्क ४१ कोटी रुपयांना विकले गेले आहेत आणि त्यांनी एक नवा विक्रम नोंदवला आहे. काही महिन्यांपूर्वी क्रिश 3 आणि एसआरकेच्या रा-वन च्या सॅटेलाईट हक्कांसाठीही कोट्यावधीही रुपये मोजण्यात आले होते. पण अग्निपथने या दोन्ही सिनेमांवर मात केली आहे. अग्निपथचे सॅटेलाईट प्रसारणाचे हक्क ४१ कोटी रुपयांना तर क्रिश 3 चे ३७ कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
बॉलिवूडसाठी २०११ हे वर्ष चांगलं गेलं आणि २०१२ हे आशादायी असं बॉलिवूडमधील सूत्रांचे म्हणणं आहे. पण अग्निपथ वर्षाच्या पहिल्या महिन्यात रिलीज होत असल्याने आणि त्यात दिग्गज कलाकारांनी अभिनय केला असल्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. करण जोहरची निर्मिती आणि करण मल्होत्राचे दिग्दर्शन असलेल्या अग्निपथचे प्रोमोज डॉन 2 सोबत थिएटर्समध्ये झळकळे आहेत. प्रोमोमध्ये भरपूर ऍक्शन, ड्रामा आणि रक्तपात दिसून येत असल्याचं मत समीक्षक राजा सेन यांनी व्यक्त केलं आहे.
रिशी कपूरने खलनायकी भूमिकेत रंग भरले आहेत तर हृतिकने अमिताभ बच्चन भूमिका आपल्या स्वत:च्या स्टाईलमध्ये केली आहे. सिनेमातलं कतरिनाचं चिकनी चमेली या गाण्याने सर्वत्र धूम मचवली आहे. हृतिक आणि संजय दत्तमुळे ही ऍक्शन फिल्म पब्लिक डोक्यावर घेईल अशी चिन्हं आहेत. हृतिक पहिल्यांदाच ऍक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे असं तरण आदर्श यांचे म्हणणं आहे. हृतिकने नेहमी प्रमाणेच जीव ओतून काम केलं आहे.