बॉलिवूडच्या नायिकांची अक्षय कूमारशी जवळीक असणं यात नवं काहीच नाहीच, खरतरं अक्षयच्या स्वभावाची तिच तर खासियत आहे. आता दीपीका पदुकोणने अक्षय विषयी वाटणाऱ्या आपुलकीच्या ओलाव्याचा पुनरुच्चार केला आहे.
डेविड धवनचा मुलगा रोहित धवन या सिनेमातून पदार्पण करतोय. मला अक्षय आवडत नाही असा भाग या सिनेमात साकारायचा होता आणि मला तो खुपच आवडत असल्याने तसा अभिनय करणं मला खरचं अवघड जात होतं इति दीपीका पदुकोण. खऱ्या खुऱ्या आयुष्यात असलेली जवळिक आणि पडद्यावर तो नावडता असल्याचं अभिनय करणं खुपच कठिण होतं पण कलाकारांना हे कसब अंगी बाणवावंच लागतं असं दीपीकाचं म्हणणं आहे. मी आणि अक्षय या सिनेमात जोडीदार असू अशी अनेकांची अटकळ होती पण त्यात नाविन्य काहीच उरलं नसतं.
जॉनसोबत असलेल्या सीन्समध्ये अक्षय आहे आणि आमच्या तिघांची चांगली मैत्री असल्याने या सीन्समध्ये ती केमिस्ट्री दिसून येते. हा सिनेमा मुलांमधली मैत्री आणि त्याच्या शोधाबाबत आहे पण मुलींशिवाय त्याला परिपूर्णता आली नसती असंही दीपीकाचे म्हणणं आहे. जाता जाता एवढचं की अक्षयबद्दल आपुलकीचा ओलावा असणं किंवा जवळीक असणं इतपत ठीक आहे पण त्याचं रुपांतर अती जवळीकीत झाल्यास ट्विंकल ट्विंकल लीटल स्टार नव्हे तर डोळ्यासमोर काजवे चमकु शकतात हे दीपीकाने ध्यानात ठेवलेलं बरं.