www.24taas.com, मुंबई
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या आपल्या आगामी चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट (फक्त प्रौढांसाठी) मिळालं तरी फरक पडत नाही असं दिग्दर्शक अनुराग कश्यप याचं म्हणणं आहे. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फिल्म ही लहान मुलांसाठी नाही.
“सिनेमा अजून सेंसॉर बोर्डाकडे पाठवलेला नाही. पण हा सिनेमा फक्त प्रौढांसाठीच आहे. या सिनेमाला ‘A’ सर्टिफिकेटच मिळायला हवं. पण सिनेमात कुठलाही कट सुचवला जाऊ नये”, अशी अनुराग कश्यप याची इच्छा आहे.
या सिनेमात मनोज बाजपेयी, नवाझुद्दिन सिद्दिकी, रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहेत. नुकताच कांस महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला होता. हा चित्रपट सर्वांना आवडावा हिच अनुराग कश्यप याची इच्छा आहे.
‘A’ सर्टिफिकेट मिळाल्यावर या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होण्याची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारल्यावर कश्यप म्हणाला, “सगळेच सिनेमे मुलांसाठी नसतात. प्रौढ प्रेक्षक माझा चित्रपट पाहू शकतात. त्यामुळे प्रौढ प्रेक्षक येतील आणि सिनेमा पसंत करतील.”