सलमानला आख्खं बॉलिवूड, त्याच्या जवळची मित्रमंडळी, चाहते, लाडाने भाई म्हणून हाक मारतं. पण यामुळेच तो वैतागला आहे. आता देखण्या मुलीही भाई म्हणायला लागल्यावर माणसाचं टाळकं सटकणार नाही तर काय? सलमानला आता विश्वबंधुत्वाचं ओझं वागवणं कठीण जात आहे यात नवल ते काय?
आता हेच बघ ना काही दिवसांपूर्वी दुबईच्या एका कार्यक्रमात दाक्षिणात्य अभिनेत्रीने सलमानला भाई म्हटल्यावर तो उचकला आणि म्हणाला की मला दोन बहिणी आहेत आणि त्या पुरेशा आहेत. यात सलमानचं काय चुकलं. एकतर वयाची 46 वर्षे झाली तरी तो बोहल्यावर चढू शकला नाही, कारणं काहीही असोत...
सुनील शेट्टीने त्याला भाई हाक मारल्यावर सलमान मिश्किलपणे म्हणाला की तुझ्या लग्नात मी दहा वर्षांचा होतो आणि सोहैल पाच वर्षाचा होता आणि तू देखील मला भाई म्हणून हाक मारतोस कमालच आहे. पण गम्मत म्हणजे अनेक देखण्या अभिनेत्रींशी सूत जूळवणाऱ्या सलमानला भाई म्हटलं जात यातच किती विरोधभास आहे.