शुटिंगच्या वेळी आमिरला कोण सतावतं?

बॉलिवूड स्टार आमिर खान जेव्हा कधी शुटींग निमित्त बाहेरगावी जातो, त्यावेळी त्याला आपल्या घराची नेहमी आठवण सतावत असते. तो आता ‘धूम ३’च्या शुटिंगसाठी शिकागो जाणार आहे.

Updated: Jul 3, 2012, 09:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड स्टार आमिर खान जेव्हा कधी शुटींग निमित्त बाहेरगावी जातो, त्यावेळी त्याला आपल्या घराची नेहमी आठवण सतावत असते. तो आता ‘धूम ३’च्या शुटिंगसाठी शिकागोला जाणार आहे.

 

आमिर खानने बिग एफएमला दिलेल्या मुलाखतीत हे कबूल केले आहे. शुटिंगसाठी मी घरापासून दूर जातो, त्यावेळी मला घराची खूप आठवण येते. खास करून पहिल्या आठवड्यात तर घरच्या व्यक्तींची खूप आठवण येते आणि त्यामुळे आमिर खूप अस्वस्थ असतो. आता तीन महिन्यांसाठी आमिर अमेरिकेला जाणार आहे, त्यामुळे यावेळीही त्याला ही अडचण येणार दिसते.

 

यावेळी तो पत्नी किरण राव आणि मुलगा आझादला आपल्यासोबत घेऊन जाणार आहे.  आदित्य चोपडा याच्या धूम या सिरीजमधील तिसरा चित्रपटातील तिसरा भाग आहे. या चित्रपटात आमिर खानसह कतरिना कैफ असून मूळ कलाकार म्हणून उदय चोपडा आणि अभिषेक बच्चनही दिसणार आहेत.

Tags: