www.24taas.com, मुंबई
सैफ- करीनाच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर खरंतर सगळ्यांचंच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागलं आहे. वर्षाअखेरीपर्यंत हे लग्न होणार असल्याचं वेगवेगळ्या सूत्रांकडून कळवण्यात येत होतं. मात्र, आता हे लग्न आणखी एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
करीना- सैफ हे इतक्यात लग्न करणार नसल्यामुळे सैफची बहिण सोहा आणि तिचा प्रियकर कुणाल खेमू यांचंही लग्न लांबणीवर पडणार होतं. पण, नवाब बडे भय्या सैफने मात्र सोहा आणि कुणालचं लग्न आधी व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. बडे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर नवाब बनलेल्या सैफवर सगळ्या घरगुती आणि इतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. अशा वेळी एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे सैफने आपल्या बहिणीचं लग्न आपल्या आधी करण्याचं मनावर घेतलं आहे.
लवकरच कुणाल आणि सोहा यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात येणार आहे. आणि सोहा-कुणालचा विवाह या वर्षाअखेरीपर्यंत होणार आहे. त्यामुळे सतत लांबणीवरच पडत असलेला सैफ- करीनाच्या लग्नाचा मुहुर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.
तसंही सैफचा होम प्रोडक्शन असलेला एजंट विनोद बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. एकीकडे करीनाचे लागोपाठ सुपर हिट सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजत आहेत. तिच्याकडे सध्या असणारी प्रोजेक्ट्ससुद्धा मोठी आणि इंटरेस्टिंग आहेत. तेव्हा या अशा प्रसंगांत बेबोला तरी लग्नाची अजिबातच घाई नाही. त्यामुळे वारंवार लांबणीवर पडत असणारं सैफ –करीनाचं लग्न खरंच होणार का, असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय...