पुढचं पाऊल.. काय होतयं सरदेशमुखांच्या घरात?

पुढचं पाऊल ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कांचनमाला आणि रुपाच्या कारवाया थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही. कांचनमालाने रचलं आहे एक नवं षडयंत्र. त्यामुळे कांचनमालाच्या डोक्यात नवं काही तरी शिजतंय आहे.

Updated: Apr 4, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com

 

पुढचं पाऊल ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली आहे. कांचनमाला आणि रुपाच्या कारवाया थांबण्याची काही चिन्ह दिसत नाही. कांचनमालाने रचलं आहे एक नवं षडयंत्र. त्यामुळे कांचनमालाच्या डोक्यात नवं काही तरी शिजतंय आहे.

 

सरदेशमुखांच्या घरात पेस्ट कंट्रोल करण्याचा घाट आक्कासाहेबांनी घातला आहे. आणि त्याच दरम्यान गुप्त खजिन्याचा शोध घेण्याचं रुपाने ठरवलं आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही रुपाने यासाठी कांचनमालाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कांचनमालानेसुद्धा गुप्त खजिन्यासाठी एक नवं षडयंत्र रचलं आहे.

 

मात्र, आक्कासाहेबांच्या आदेशानुसार कांचनमालाच्या पाळतीवर असणारा चिंतामणी पेस्ट कंट्रोल करणाऱ्या माणसाचं आणि कांचनमालाचं बोलणं चोरुन ऐकतो. तेव्हा आता कांचनमालाचा प्लॅन यशस्वी होणार का? मालिकेत काय नाट्यमय घडामोडी घडणार याचीच प्रतिक्षा करुया.