अण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेट

केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Updated: Jun 4, 2012, 08:24 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे.  काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळलेत. त्यानंतर आज अण्णांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गावपातळीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांना भेटणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. तर सरकारवर होणा-या आरोपांचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे युक्तिवाद करावा अशी सूचना पंतप्रधानांनी काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत केली. भ्रष्टाचार दूर कऱण्यासाठी आपलं सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

तसचं याबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करून भ्रष्टाचार हटवण्यास वचनबद्ध असल्याचं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लोकपालच्या मुद्द्यावर अण्णांनी सरकारवर पुन्हा टीका केलीय. मंत्र्यांविरूद्ध आमच्याकडे पुरावे आहेत पूर्वग्रहदूषीत हेतूने आरोप केले जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="114541"]