आसाममध्ये नौका उलटून १०० मृत्युमुखी

आसामध्ये नौका दुर्घटनेत १०० जणांचा बळी गेल्याची घटना घडली तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आसाममधील हा सर्वात मोठा अपघात आहे.

Updated: May 1, 2012, 10:47 AM IST

www.24taas.com, ढुबरी

 

 

आसामध्ये नौका दुर्घटनेत १०० जणांचा बळी गेल्याची घटना घडली तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आसाममधील हा सर्वात मोठा अपघात आहे.

 

 

ढुबरीघाट येथून ३०० लोकांना नौका घेऊन चालली होती. नदी पार करीत असताना पाण्याचा भोवरा आल्या यामध्ये ही नौका सापडली.  त्यामुळे नौका उलटल्याने ३०० प्रवासी नदीत आलेल्या पाण्याच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता झालेत तर १०० जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेतील  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, १०० लोकांनी पोहत आपला जीव वाचवला.

 

 
नौका दुर्घटनेची माहिती मिळताच सीमा सुरक्षा बलाचे आणि एनडीआरएफचे जवान  हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी मदत कार्य सुरू केले. या घटनेबाबत राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन  सिंग यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान कार्यालयाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाना राष्ट्रीय आपातकालीन निधीतून मदत देण्याचे जाहीर केले आहे.