एअर इंडियाचे पायलट संपावर, उड्डाने रद्द

एअर इंडियाच्या १०० हून अधिक पायलटांचे व्यवस्थापनाबरोबरचे बोलणे फिस्कटल्याने ते सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम विमान उड्डानावर झाला आहे. त्यामुळे काही मार्गावरील हवाई वाहतूक बंद आहे.

Updated: May 8, 2012, 09:48 AM IST

www.24taas.com, मुंबई

एअर इंडियाच्या १०० हून  अधिक   पायलटांचे व्यवस्थापनाबरोबरचे बोलणे फिस्कटल्याने ते सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम विमान उड्डानावर झाला आहे. त्यामुळे काही मार्गावरील हवाई वाहतूक बंद आहे.

दोन दिवसांपासून मागण्यांबाबत पायलटांचे व्यवस्थापनाशी  बोलणे सुरू होते. मात्र, तोडगा न निघाल्याने पायलटांना कामबंद आंदोलन सुरू केले. केवळ देशांतर्गंत उड्डाण करणाऱ्या वैमानिकांनाच नव्याने दाखल झालेल्या बोइंग ७८७चे प्रशिक्षण देण्याच्या एअर इंडियाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात या पायलटनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अन्य पायलटही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बोइंगचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या पायलटनाही देण्यात यावे, यासाठी वैमानिकांच्या प्रतिनिधींची व्यवस्थापनाशी सोमवारी चर्चा झाली. मात्र त्यात समाधानकारक तोडगा न निघाल्याने पायलटांनी काम बंद करण्याचे जाहीर केले. मात्र सध्यातरी देशांतर्गंत वाहतूक विनाव्यत्यय सुरू असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. एअर इंडियाची काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांने रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.