www.24taas.com, नवी दिल्ली
‘एमडीएलआर’ एअर लाईन्समध्ये काम करणाऱ्या गीतिका शर्माने शनिवारी अशोक विहार येथील राहात्या घरी फाशी लावून आत्महत्या केली. तिच्या जवळ सापडलेल्या पत्रात तिनं हरियाणाचे मंत्री गोपाल कांडा यांचे नाव घेतलंय. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय.
एअरहोस्टेस गीतिका शर्माच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणा सरकारचे मंत्री गोपाल कांडा यांनी राजीनामा दिलाय.. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कांडा यांना अटक होण्याची शक्यता आहे. एमडीएलआर एअर लाईन्समध्ये काम करणाऱ्या गीतिका शर्माने शनिवारी अशोक विहार येथील राहात्या घरी फाशी लावून आत्महत्या केली. तिच्या जवळ सापडलेल्या पत्रात तिने गोपाल कांडा यांचे नाव घेतले आहे. तसेच कांडाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचाही उल्लेख पत्रात आहे. पोलिसांनी रविवारी कांडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गीतिकावर नोकरीवर पुन्हा हजर राहण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली असा आरोप तीच्या भावानं केला. २३ वर्षीय गितीका आधी एमडीएलआर एअर लाईंन्समध्ये एअर होस्टेस होती. त्यानंतर तिने एमिरेट्स एअर लाईंन्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये गितीकाने पुन्हा एमडीएलआर एअर लाईंन्स जॉईन केले आणि एमडीएलआरची सहकंपनी 'सुपरसोनिक'मध्ये संचालकपद मिळविले. त्यानंतर गीतिकाने ही नोकरी देखील सोडून दिली. याप्रकरणानंतर लोकदलाने कांडा यांना अटक करण्याची मागणी केलीय.
.