कृपांची संपत्ती जप्ती योग्य – सुप्रीम कोर्ट

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

Updated: Mar 13, 2012, 06:05 PM IST

 www.24taas.com, नवी दिल्ली

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठलीही मालमत्ता विकणार नाही, असं प्रतिज्ञापत्र कृपाशंकर सिंहांनी कोर्टात सादर केले आहे. हायकोर्टानं कृपांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आणि संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कृपांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या मुंबईतल्या मालमत्तांवर छापासत्र आणि जप्तीचं सत्रही पार पडलं.

मात्र अजूनही कृपाशंकर सिंह यांना अटक झालेली नाही. सुप्रीम कोर्टानंही कृपांना दणका दिल्यानंतर आतातरी कृपांना अटक होणार का, हा खरा प्रश्न आहे.

पण त्यांना काही अंशी दिलासा देत नव्याने संपत्ती जप्त करण्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तसंच हे प्रकरण निकालात येत नाही तोपर्यंत त्यांची इतर संपत्ती जप्त केली जाणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. पण या संपत्तीचं हस्तांतरण किंवा व्यवहार न करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन महिन्यांनंतर होणार आहे.