www.24taas.com, पणजी
गोव्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. या उत्सवाची सुरूवात रंगांची बरसात करत होते. नुकतंच सत्तांतर झाल्यानं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळंच या शिमगोत्सवाला यावर्षी उधाण आलं आहे.
गोव्याचे भावी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या उत्सवात सहभागी झाले. हा पारंपरिक शिमगोत्सवात गुलालोत्सवही साजरा केला जातो. गुलालोत्सवाची सुरूवात गोव्याची आराध्य दैवत महालक्ष्मीची ओटी भरून होते. महालक्ष्मीची ओटी भरल्यानंतर लक्ष्मीची भव्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत ढोलताशांच्या जोडीला लोकनृत्यांची रंगत असते. त्यानंतर या मिरवणुकीचं रुपांतर होतं गुलालोत्सवात. वेगवेगळे रंग आसमंतात उधळलेले पाहायला मिळतात.
दरम्यान काँग्रेसला खाली खेचत भाजप गोव्यात सत्ता स्थापणार आहे. त्याचा आनंद आजच्या गुलाललोत्सवात द्विगुणीत झाला. भावी मुख्यंमंत्री मनोहर पर्रिकर या गुलालोत्सवात सहभागी झाल्यानं कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.