www.24taas.com, पणजी
३१ मार्चपासून पेट्रलचे भाव ५ रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा चालू असतानाच गोवा सरकारने मात्र २ एप्रिलपासून पेट्रोलचे भाव ११ रुपये प्रति लीटरने स्वस्त केला आहे आहे.
गोव्यातील भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पेट्रोलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. २ एप्रिलपासून पेट्रेलवर फक्त ०.१ % एवढाच वॅट असेल. सध्या गोव्यामध्ये पेट्रोलवर २० % वॅट भरावा लागत आहे. यामुळे सध्या ६६ रुपये प्रति लीटरने मिळणारं पेट्रोल ५५ रुपये प्रति लीटरने मिळणार आहे.
पर्रिकर यांनी एअरलाइन्स कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. गोव्यात हवाई इंधनावरील वॅट २२% वरुन ११ टक्क्यांवर आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे एरलाइन्स आता गोवा एअरपोर्टवर स्वस्तात इंधन भरू शकतील.