जयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

Updated: Feb 14, 2012, 09:17 AM IST

www.24taas.com, जयपूर

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

महापालिका सभागृहात शहरातल्या महत्वपूर्ण विषयांवर बैठक सुरू होती. चर्चेत कचऱ्याचा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू झाली. त्याचवेळी अपक्ष नगरसेवक हाजी नवाब अली यांनी आरोग्य समितीचे अध्यक्ष रोशन सैनी यांच्या अंगावर कचरा फेकला. राग अनावर झालेल्या सैनी यांनी हाजीअलीवर थेट हल्लाबोल करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सभागृहांत सर्वांसमोर हा प्रकार घडला.

यातून लोकप्रतिनिधी देशात खरोखरच लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार करत आहेत का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी सभागृहात धुमशान झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र एक नगरसेवकाला लाथा-बुक्क्यांनी सभागृहात पाडून मारण्याची घटना म्हणजे गुंडगिरीचा अतिरेक ठरली आहे.