ज्ञानपीठ विजेत्या इंदिरा गोस्वामी याचं निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या.

Updated: Nov 29, 2011, 08:46 AM IST

झी २४ तास वेब टीम, आसाम

 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

समाजातील धार्मिक तेढ आणि सांप्रदायिकतेविरुद्ध त्यांनी कठोर मते मांडलेली होती. इंदिरा गोस्वामी यांनी बंदी घातलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) आणि केंद्र सरकारदरम्यान शांती समझोत्यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवली होती. मात्र २००५ साली गोस्वामी यांनी या प्रक्रियेतू स्वतःला बाहेर केले होते. गोस्वामी यांना साहित्यातील योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार (१९८२) आणि ज्ञानपीठ पुरस्कार (२०००) देण्यात आले होते.