देशातील खासगी डॉक्टर संपावर

देशातील खासगी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. खासगी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात पुण्यातील डॉक्टर्स देखील सहभागी झाले आहे . पुणे इंडियन डिकल असोसिएशननं मोर्चा काढून संपला पाठींबा दर्शवला.

Updated: Jun 25, 2012, 01:24 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

देशातील खासगी डॉक्टर  आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर  गेले आहे. खासगी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात पुण्यातील डॉक्टर्स देखील सहभागी झाले आहे . पुणे इंडियन डिकल असोसिएशननं मोर्चा काढून संपला पाठींबा दर्शवला.

 

टिळक रस्त्यावरील IMA कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारचे प्रस्तावित NCHRH बिल , क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँक्ट रद्द करावा आणि MCI ची बरखास्ती करू नये या मागण्यांसाठी हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे . IMA बरोबरच नर्सिंग असोसिएशन, फार्मसी असोसिएशन आदिनीही या संपला पाठींबा दर्शवलाय.

 

संपामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही . याची दक्षता घेण्यात आली असल्याचं IMA च्या वतीनं सांगण्यात आलय . मोठ्या खासगी हॉस्पिटलच्या सेवेवर संपाचा फारसा परिणाम दिसून येत नाही . या हॉस्पिटल्सनी संपाला पाठींबा दिला आहे . मात्र हॉस्पिटल बंद राहणार नाहीत . डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार आहेत .

 

क्लिनिकल स्थापना अधिनियम  या कायद्याच्या विरोधात आज देशातील खासगी डॉक्टर संपावर जाणार आहेत. या प्रस्तावित कायद्यानुसार हॉस्पिटल नर्सिंग होम आणि क्लिनिक सुरू करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. खाजगी डॉक्टरांना आपलं क्लिनिक किंवा हॉस्पिटल सुरू करताना या अटींचे पालन करावं लागणार आहे. या अटी डॉक्टरांना जाचक वाटत असल्याने संप पुकारण्याचा निर्णय खाजगी डॉक्टरांनी घेतला आहे. या संपाला  इंडियन मेडिकल असोशिएशन, ग्नायनोलॉजिस्ट असोशिएशन  सारख्या अनेक संघटनांनी पाठिंबा दिलाय.