मुखर्जी, संगमा यांचे अर्ज दाखल

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी सकाळी ११ वाजता तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनी आज (गुरुवार) दुपारी अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Updated: Jun 28, 2012, 04:19 PM IST

www.24taa.com, नवी दिल्ली 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी  सकाळी ११ वाजता तर  राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांनी आज (गुरुवार) दुपारी अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रणव मुखर्जी यांच्या  उमेदवारी अर्ज भरण्याच्यावेळी  पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि युपीएच्या घटकपक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तर पी. ए. संगमा यांच्यावेळ बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक, अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि अन्य घटकपक्षाचे नेते उपस्थित होते.

संगमाच राष्ट्रपतिपदी विराजमान होतील, असा विश्‍वास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मत अद्याप गुलदस्त्यात आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मात्र आपला प्रतिनिधी पाठवून संगमा यांना समर्थल दिले.