झी 24 तास वेब टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करण्यासाठी नऊ दिवसांच्या दौर्यावर येथे आले असून मोदी सरकारने त्यांना ‘विशेष अतिथी’चा दर्जा देऊ केला आहे. ते या दौर्यात अनेक ठिकाणी भेट देणार असून सर्वत्र त्यांची शाही बडदास्त ठेवली जाणार आहे. त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा, विविध विभागांचे अधिकारी सोबत असतील.
[caption id="attachment_2008" align="alignleft" width="266" caption="मोदी सरकार देशात सर्वोत्तम – राज"][/caption]
राज ठाकरे आपल्या पक्षाखेरीज कुठेही मोठय़ा पदावर नाहीत, तसेच ते कोणत्याच सरकारमध्ये प्रतिनिधित्वही करत नसल्याने त्यांना विशेष अतिथीचा दर्जा दिला जाऊ नये, असे गुजरात प्रशासनातील अधिकार्यांचे मत होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या कार्यालयाने यात हस्तक्षेप करत राज यांना विशेष दर्जा देण्याचा आग्रह धरला होता.
ठाकरे यांनी आज महात्मा गांधी आर्शमाला भेट देऊन दौर्याला सुरुवात केली. या दौर्यात ठाकरे अक्षरधामपासून ते टाटांच्या नॅनो प्रकल्पापर्यंत अनेक ठिकाणी भेट देणार आहेत.यावेळी सरकारमधील वेगवेगळ्य़ा खात्यांचे अधिकारी त्यांच्यासोबत असतील. तसेच वेगवेगळ्य़ा 10 विषयांवर त्यांच्यासमोर प्रेझेंटेशनही केले जाणार आहे.