युद्धभूमीवर आता 'शांती'

भारतीय लष्करात शांती टिग्गा या 35 वर्षीय महिलेनं स्वकर्तृत्व आणि स्वबळावर प्रवेश मिळवलाय. लष्करातली ही पहिलीच रणरागिणी ठरणार आहे. प्रांतिक सेनादलाच्या 969 रेल्वे अभियांत्रिकी तुकडीतून शांतीने लष्करात प्रवेश केलाय.

Updated: Oct 9, 2011, 01:06 PM IST

झी 24 तास वेब टीम

 

लष्करातली पहिली रणरागिणी - शांती टिग्गा

भारतीय लष्करात शांती टिग्गा या 35 वर्षीय महिलेनं स्वकर्तृत्व आणि स्वबळावर प्रवेश मिळवलाय. लष्करातली ही पहिलीच रणरागिणी ठरणार आहे. प्रांतिक सेनादलाच्या 969 रेल्वे अभियांत्रिकी तुकडीतून शांतीने लष्करात प्रवेश केलाय. पश्चिम बंगालच्या जलपयगुडी जिल्ह्यातून 2005 साली पॉइंट्समन म्हणून शांती भारतीय रेल्वेत भरती झाली होती.

 

आता पर्यंत केवळ अधिकारी पदांवर किंवा थेट लढाईशी संबंध येणार नाही अशा पदांवर महिलांना लष्करात प्रवेश होता. पण शांतीनं शारीरिक क्षमतांच्या सगळ्या कसोट्या पार करत 13 लाख जवानांचा समावेश असलेल्या लष्करात प्रवेश केलाय. 2 मुलांची आई असलेल्या शांतीने धावण्याच्या शर्यतीत पुरूष स्पर्धकांपेक्षा 5 सेकंद आधीच दीड किलोमीटरचं अंतर कापलं.