IND VS BAN 2nd Test 4th Day : भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांच्यातील दुसरा सामना हा कानपुर येथे खेळवला जात आहे. कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सामन्याचा एकही बॉल खेळवण्यात आला नव्हता. मात्र चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली तसेच मैदान सुद्धा सुस्थितीत असल्याने चौथ्या दिवशी सामना सुरु करण्यात आला. यावेळी रोहित शर्माने बांग्लादेशच्या लिटन दासचा अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्या इनिंगची 50 वी ओव्हर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज टाकत होता. यावेळी सिराजने चौथा बॉल टाकला तेव्हा लिटन दास स्ट्राईकवर होता. सिराजच्या टाकलेल्या बॉलवर लिटने स्टेप आउट करून इनफ़ील्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ फुलर बॉल मिडऑफच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात मैदानात फिल्डिंगसाठी उभ्या असलेल्या रोहितने एका हाताने हा कॅच पकडला. विराट आणि सिराज रोहितने पकडलेला हा कॅच पाहून हैराण झाले. तर रोहित सुद्धा हा कॅच पकडल्यावर काहीकाळ स्तब्द होता.
WHAT. A. CATCH
Captain @ImRo45 with a screamer of a catch as Litton Das is dismissed for 13.@mdsirajofficial picks up his first.
Live - https://t.co/JBVX2gyyPf… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/60saRWTDtG
— BCCI (@BCCI) September 30, 2024
सिराजने लिटन दासला बाद करण्यापूर्वी कॅप्टन रोहितने रणनिती बनवली होती. बांग्लादेशच्या फलंदाजाला अडकवण्यासाठी त्याने कोहलीला एक्स्ट्रा कव्हरवर उभे केले होते. त्यानंतर या डावपेचात लिटन दास कॅच आउट झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने त्याला कॅच आउट केले. लिटन दास केवळ 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने हा अफलातून कॅच पकडल्यावर विराट आणि सिराजच्या मैदानात जोरदार प्रदर्शन केले. लिटन दासच्या रूपाने टीम इंडियाला बांगलादेशची पाचवी विकेट मिळाली.
Virat Kohli and Mohammad Siraj's reactions on Rohit Sharma's Catch. pic.twitter.com/caHVEy4Ku3
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 30, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा टेस्ट सामना 27 सप्टेंबर पासून कानपुर येथे खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्याच दिवशी पावसाच्या आगमनामुळे केवळ 35 ओव्हर खेळवण्यात आल्या. यात भारताने बांग्लादेशच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि बांगलादेशने 107 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याही दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने खेळ एकही बॉल न खेळवता रद्द झाला तर तिसऱ्या दिवशी मैदान ओलसर असल्याने खेळ रद्द करण्यात आला.
हेही वाचा : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रित बुमरा, मोहम्मद सिराज
शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार ), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिट्टन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद