युपीएचं अखेर ठरलं...प्रणवदाचं होणार राष्ट्रपती

यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे् प्रणव मुखर्जी असणार आहेत. यूपीच्या बैठकीत प्रणव मुखर्जी ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सोनिया गांधीनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जींच्या नावाची स्वत: घोषणा केली आहे.

Updated: Jun 16, 2012, 08:37 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार हे् प्रणव मुखर्जी असणार आहेत. यूपीच्या बैठकीत प्रणव मुखर्जी ह्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सोनिया गांधीनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जींच्या नावाची स्वत: घोषणा केली आहे.

युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची आज घोषणा आज करण्यात आलेली आहे. युपीएच्या आजच्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

२४ जूनला ते अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. मुखर्जी यांच्या बरोबरच चिदंबरम, कपिल सिब्बल हेही दाखल झाले होते.