www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.
लष्कराच्या जागेवर बंगल्याचं काम सुरु होतं. निवृत्तीनंतर त्या पुण्यातल्या याच बंगल्याच राहायला जाणार होत्या. पुण्यामधील खडकी येथील कॅन्टॉन्मेंट भागात २६,१०० चौरस फूट जागा राष्ट्रपतींना लष्कराकडून दिली गेली होती. मात्र, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना घरे बांधण्यासाठी सरकारकडे जमिन नसताना राष्ट्रपतींच्या बंगल्यासाठी जमीन देण्यास माजी सैनिकांनी विरोध केला आहे.
कायद्यानुसार राष्ट्रपती ४ हजार ५०० चौरस फूट आकाराचा सरकारी बंगला किंवा सरकारच्या अखत्यारितला २ हजार चौरस फूट आकाराचा बंगला मिळवू शकतात. मात्र लष्कराच्या जागेवर सुरु असलेल्या २६,१०० चौरस फूट जागेवरील बांधकामामुळं याबाबत टीका होत होती. या टीकेनंतर व्यथित होऊन वादग्रस्त जागा परत करण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतलाय. मात्र निवृत्तीनंतर राष्ट्रपतीचं निवासस्थान निश्चित नाहीत.