राहुल गांधींचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंतप्रधान बनणं हे माझं ध्येय नसून, उत्तर प्रदेशचा विकास हेच ध्येय असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात होणा-या मतदानाचा प्रचार आज संपणार आहे.

Updated: Feb 6, 2012, 06:10 PM IST

www.24taas.com, लखनऊ

उत्तर प्रदेशातील लोक ज्या ठिकाणी जातात, तो प्रदेश बदलून टाकतात. त्यांनी  महाराष्ट्रही बदलला, शिवसेनेचे लोकं त्यांना तिथं मारतात, ते मार खातात, तिथून हटत नाहीत, टॅक्सी चालवतात, काम करतात, मला त्यांची क्षमता मागील तीन महिन्यापांसून समजली आहे, असा उत्तर भारतीयांची प्रशंसा करताना काँग्रेसच सरचिटणीस राहुल गांधी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

 

उत्तर प्रदेशातील  लोकांचे हात खुले केले तर ते कायापालट करतील, अशी मला खात्री  आहे. त्यांना  संधी मिळाली, तर ते उत्तर प्रदेश बदलतील, असा मला विश्वास असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

पंतप्रधान बनणं हे माझं ध्येय नसून, उत्तर प्रदेशचा विकास हेच  ध्येय असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेशात पहिल्या  टप्प्यात होणा-या मतदानाचा प्रचार आज संपणार आहे. यानिमित्तानं ते वाराणसीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

गेली 22 वर्षं उत्तर प्रदेशातल्या जनतेला इथल्या नेत्यांनी मूर्ख बनवून गुंडाराज केल्याचा हल्लाबोल राहुलनी विरोधकांवर केला. या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस नव्यानं प्रस्थापित होईल आणि युपीतली राजकीय समीकरणं काँग्रेस ठरवेल, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. मायावतींनी गरिबांची फसवणूक केली तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या गावांकडे फिकल्याही नाहीत अशी टीका राहुल गांधींनी केली. आमची बांधिलकी उत्तर प्रदेशच्या जनतेसोबत आहेत आणि गुंड-लुटारुंसोबत युती करणार नाही असंही राहुल गांधी म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

Tags: