रिलायन्सचं ब्रॉडबँड लवकरच देशभरात

रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच देशभरात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिक्षण, सुरक्षा, वित्त सेवा आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांना इंटरनेट सेवा पुरवण्याच्या योजनांवर शेवटच्या टप्प्यात असल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

Updated: Jun 7, 2012, 04:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच देशभरात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिक्षण, सुरक्षा, वित्त सेवा आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांना इंटरनेट सेवा पुरवण्याच्या योजनांवर शेवटच्या टप्प्यात असल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

सुरुवातीला आम्ही राष्ट्रीय स्तरावर ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि येत्या काळात आम्ही प्रगती पथावरच असल्याचंही दिसून येईल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी व्यक्त केलाय. कंपनीच्या शेअरधारकांना उद्देशून ते बोलत होते. करोडो भारतीयांच्या जीवनात रिलायन्स इंडस्ट्रीज डीजिटल सेवा बदल घडवून आणू शकेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी इन्फोटेल ब्रॉडबँडला २० मेगाहर्टचा अखिल भारतीय ब्रॉडबँड वायरलेस स्पेक्ट्रम मिळाला होता. हा स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी तब्बल १२,८४७.७१ करोड रुपये रिलायन्सनं मोजलेत. यानंतर कंपनीनं सेवा सुरू करण्यासाठी ही योजना आखल्याचं समजतंय.     

.