'लोकपाल'चा मुहूर्त शुक्रवारी?

लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

Updated: Dec 7, 2011, 10:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. मात्र ' लोकपाल'च्या कार्यकक्षेत पंतप्रधानांचा समावेश करण्याबद्दल अजूनही संभ्रम काय आहे.

 

'लोकपाल'च्या कक्षेत पंतप्रधानांना आणण्यासंदर्भात समितीच्या सदस्यांमध्ये तीन तट पडले होते. काहींच्या मते पंतप्रधानांचा 'लोकपाल'मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. काहींच्या मते पंतप्रधानांना वगळले पाहिजे. तर, काहींनी पंतप्रधानांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांची 'लोकपाल'ने चौकशी करावी अशी भूमिका घेतली. या समितीतल्याच मतांतरामुळे समितीने पंतप्रधानांबाबतीत कोणतीच शिफारस न करण्याचा निर्णय घेतला.

 

अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल संमत करण्याचा शब्द सरकारने दिला होता. पण, संसदेचं कामकाज सतत ठप्प होत असल्यामुळे लोकपाल बिल खरंच संमत होईल का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र शुक्रवारी यावर चर्चा होण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यस्तरीय कनिष्ठ सरकारी कर्मचारी वर्ग लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येणार आहे. मात्र, केंद्रिय कनिष्ठ सरकारी कर्मचारी वर्ग यात समाविष्ट करण्यात आलेला नाही.

 

 

[jwplayer mediaid="11902"]