संसद हल्ल्यातील शहिदांना 'झी अनन्य सन्मान' समर्पित

१३ डिसेंबर २००१ रोजी म्हणजेच दहा वर्षांपूर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्य़ा लोकशाहीच्या प्रतीकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Updated: Dec 12, 2011, 09:13 AM IST

झी २४ तास वेब टीम, दिल्ली

 

१३ डिसेंबर २००१ रोजी म्हणजेच दहा वर्षांपूर्वी जगातल्या सगळ्यात मोठ्य़ा लोकशाहीच्या प्रतीकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बंदुकीच्या धाकावर लोकशाहीवर श्रद्धा असलेल्या लोकांच्या भावनांचं प्रतीक असलेल्या संसदेवर झालेला हल्ला शूर सैनिकांनी परतवून लावला. अनन्य सन्मान २०११ लोकशाहीच्या रक्षणासाठी शहिद झालेल्यांना समर्पित करण्यात आला. १३ डिसेंबर २००१ ही तारीख कोणतीही भारतीय व्यक्ती विसरू शकत नाही.

 

पाच दहशतवादी या दिवशी संसदेवर हल्ला करण्याच्या कुटिल हेतूनं आले होते. मात्र ज्या देशाचा पाया बलिदान, शौर्य आणि देशभक्ती यांनी बनलेला त्या देशात असे हल्ले टिकू शकत नाहीत. संसदेला घेरण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना वीर सैनिकांनी चोख उत्तर दिलं. प्राणाचं बलिदान देऊन लोकशाहीवर आलेलं संकट त्यांनी परतवून लावलं. याच महान शहिदांना अनन्य सन्मान 2011 समर्पित करण्यात आला.

 

यावेळीही झी न्यूज त्याच परंपरेला पुढे कायम ठेवत आहे. ज्याचा पाया २००८ मध्ये रचण्यात आला होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांचं स्मरण करून जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता हा प्रयत्न एखाद्या शपथेप्रमाणं पाळला जातो. २०११ चा अनन्य सन्मान संसदेपासून सडकेपर्यंत लोकशाहीच्या बळकटीसाठी झटणाऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे. १३ डिसेंबरला संपूर्ण देश झी न्यूज बरोबर संसद हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे.