सबसे बडे खिलाडी कलमाडी येरवड्यात ?

पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.

Updated: Dec 22, 2011, 07:43 PM IST

झी 24 ताससाठी पुण्याहून नितीन पाटोळे

पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.

पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींची तिहारनंतर येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. कॅगच्या ताशे-यानंतर राज्य सरकारनं तयार केलेल्या रिपोर्टमध्ये 2008 मध्ये झालेल्या राष्ट्रकूल युवा क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आणि सीवायजीमधील अनेक आक्षेपार्ह निर्णयांसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं.

कॅगच्या ताशे-यानंतर राज्य सरकारनं घोटाळ्यांवर तयार केलेला ऍक्शन टेकन रिपोर्ट विधिमंडळात मांडला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील घोटाळ्याबाबत गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. ऍक्शन टेकन रिपोर्ट विधिमंडळात मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळं एका अर्थानं कलमाडींचं भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि कलमाडी विरोधक यशस्वी होतात का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल