सीमाप्रश्न पेटला, सिंधुदुर्गात बसची तोडफोड

बेळगावमध्ये आज सीमावासियांचा मेळावा होतो आहे. सीमावासियांच्या या मेळाव्याला परवानगी दिल्याने कन्नडीयांनी याला विरोध केला आहे. सीमावासियांचा आजचा मेळावा उधळून लावण्याचं षडयंत्र कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातं आहे.

Updated: May 20, 2012, 12:06 PM IST

www.24taas.com, बेळगाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये कर्नाटकच्या बसच्या काचा फोडण्यात आल्या. कुडाळ बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटक बसच्या काही अज्ञात लोकांनी काचा फोडल्या. त्यामुळे सीमाप्रश्न पुन्हा उफाळला आहे.

बेळगावमध्ये आज सीमावासियांचा मेळावा होतो आहे. सीमावासियांच्या या मेळाव्याला परवानगी दिल्याने कन्नडीयांनी याला विरोध केला आहे. सीमावासियांचा आजचा मेळावा उधळून लावण्याचं षडयंत्र कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आखल्याचं बोललं जातं आहे.

१०० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेशांतर करून आणखीही काही कार्यकर्ते बंगळुरूहून बेळगावात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. तर शनिवारी बेळगावात झालेल्या बस तोडफोडीचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.