सोनिया गांधी भारतात परतल्या

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत. त्या वैद्यकीय चाचणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. सोनिया गांधींवर सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Updated: Mar 5, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत. त्या वैद्यकीय चाचणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. सोनिया गांधींवर सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे त्याच्या आदल्या दिवशी त्या भारतात परतल्या आहेत. सोनिया गांधींनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पक्षाचा प्रचार केला होता.

 

पक्षाचे महसचिव आणि मीडिया विभागाचे प्रमुख जर्नादन द्विवेदी यांनी वैदयकीय चाचणीनंतर सोनिया गांधी परतल्याचं तसंच त्यांची प्रकृतीत उत्तम असल्याचं सांगितलं. सोनिया गांधी ऑगस्ट महिन्यात उपचारासाठी अमेरिकेला गेल्या होत्या आणि त्यांच्या आजाराबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यावेळेस त्या एक महिना उपाचार आणि शस्त्रक्रियेसाठी राहिल्या होत्या.

 

त्याकाळात त्यांच्या अनुपस्थितीत राहुल गांधी आणि पक्षाचे तीन वरिष्ठ नेते संरक्षण मंत्री ए.के. ऍन्टोनी, जर्नादन दिवेदी, आणि सोनिया गांधींचे राजकीय सचीव अहमद पटेल यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळेस त्यांचे वास्तव्य अल्प कालावधीसाठी असल्याने तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती.