कॅनडात टेस्ला कारने घेतला पेट,नाशिकच्या युवकाचा जळून मृत्यू

Canada Telsa Blast: टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 30, 2024, 07:06 PM IST
कॅनडात टेस्ला कारने घेतला पेट,नाशिकच्या युवकाचा जळून मृत्यू
टेस्ला स्फोट

Canada Telsa Blast : टेस्ला कारने कमी वेळात जगभरात आपली ओळख बनवली आहे. ही कार भारतात आली नसली तरी देशात या कारबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. दरम्यान या कारच्या दुर्घटना झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना कॅनडाच्या टोरॅन्टो शहरामध्ये घडली आहे. ज्यामध्ये भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कशी घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये भारतीय तरुणाचा समावेश आहे. आगीत चौघा युवकांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिकच्या इंदिरानगरमधील दिग्विजय राजेंद्र औसरकर असे या तरुणाचे नाव असून तो 30 वर्षांचा होता. दिग्विजय हा नाशिकच्या इंदिरानगरमध्ये राहायला होता. टेस्ला कारच्या स्फोटात दिग्विजय याचा जळून मृत्यू झाला. त्याचे वडील आणि बहिणीला नाशिकहून कॅनडात बोलावण्यात आले आणि दोघांची डीएनए चाचणी करण्यात आली. यानंतर दिग्विजयची ओळख पटवण्यास कॅनडा पोलिसांना यश आले. या दुर्घटनेने औसरकर कुटुंबावर दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळलाय.

कशी घडली घटना 

24 तारखेला झलक पटेल दिग्विजयच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. गुजरातचे केता गोहली, नील गोहली हे भाऊ-बहिणींसह चौघेजण वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री टोरॅन्टो शहरात एकत्र जमले. त्यांच्या एका मित्राने नवीनच टेस्ला कार खरेदी केली होती. वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून हे चौघे जण ‘टेस्ट ड्राइव्ह’ला बाहेर पडले. यावेळी अचानकणे एका गतिरोधकावरून कार उलटली अन् रस्त्यांलगत असलेल्या लोखंडी गल्डरवर जाऊन आदळली. यावेळी कारने पेट घेतला. पुढे  काही मिनिटांतच टेस्लाचा मोठा स्फोट झाला. 

बर्थ डे गर्लला मिळाले जीवनदान

या अपघातात सुदैवाने बर्थ डे गर्ल झलकचे प्राण वाचले. एका जागरूक ट्रक ड्रायव्हरने दाखविलेल्या धाडसामुळे तिला जिवनदान मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

15 दिवसांपुर्वीच आई विडलांशी झाली होती भेट 

दिग्विजय दोन वर्षांपुर्वी कॅनडात गेला होता. तिथे त्याला एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती. त्याने अमेरिकेतून मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पुर्ण केले होते. तेथील विद्यापिठाने त्यास ब्रॅन्ड ॲम्बेसेडर केले होते. नोकरीनिमित्त तो कॅनडात स्थायिक होता. 15 दिवसांपुर्वीच त्याचे आई, वडील हे त्याला भेटून भारतात नाशिक येथे परतले होते. दिग्विजय हा एकुलता एक मुलगा होता.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More