आ.रामप्रसाद बोर्डीकरांना पोलीस कोठडी

परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील विमा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डिकर अखेर कोर्टात शरण आलेत. विमा घोटाळ्याप्रकरणी बोर्डिकर फरार होते

Updated: Jan 18, 2012, 11:12 PM IST

www.24taas.com, परभणी

 

परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील विमा घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डिकर अखेर कोर्टात शरण आलेत. विमा घोटाळ्याप्रकरणी बोर्डिकर फरार होते. सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळल्यानंतर आज अचानक दहा-बारा दिवसांनी बोर्डीकर जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयानं त्यांना पोलिसांच्या हवाली करताच त्यांना अटक करण्यात आली.

 

सात कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात बोर्डिकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.  शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे विमा काढले होते. त्यात बोर्डीकरांनी घोटाळा केल्याची तक्रार परभणीच्या नवा मुंडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बोर्डिकरांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.