www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात पेट्रोलवर १ टक्का आणि डिझेल वर २ टक्के अधिभार लादण्याचा निर्णय राज्यसरकरानं घेतलाय. राज्य शासनाची ही कर आकारणी औरंगाबाद, नागपूर, अमरावती,धुळे, नंदुरबार या पाच शहरांमध्ये होणार आहे.
त्यामुळं पेट्रोल 78 पैसे तर डिझेल सव्वा रुपयांनी महागणार आहे. याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बंद पुकारलाय.हा अधिभार म्हणजे औरंगाबादवर अन्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दुसरीकडं याच मुद्यावर औरंगाबादचे खासदार चंद्राकांत खैरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर हा अधिभार महिनाभरात रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना राज्यातील एकाही नेत्याला शहरात फिरकू देणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय.