काँग्रेस नगरसेवक खूनाच्या आरोपामुळे झाला फरार

औरंगाबादमध्ये काँग्रेसचा नगरसेवकावर खूनाचा आरोप ठेवला आहे. जागेच्या वादातून खून करण्यात आल्याचे निष्प्पन झाले आहे. परंतु नगरसेवक अद्यापि फरार आहे.

Updated: Nov 1, 2011, 12:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये काँग्रेसचा नगरसेवकावर खूनाचा आरोप ठेवला आहे. जागेच्या वादातून खून करण्यात आल्याचे निष्प्पन झाले आहे. परंतु नगरसेवक अद्यापि फरार आहे.

 

औरंगाबादमध्ये संपत्तीच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आला आहे. खून झालेल्या तरुणाचं नाव कय्युम खान याकुब खान असं आहे. आरोपींनी तरुणाचा मृतदेह ग्रामीण पोलिस मुख्यालायाच्या मैदानाच्या झाडीत फेकला या प्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. 

 

या प्रकरणात काँग्रेसच्या एका विद्यमान नगरसेवकाचाही समावेश आहे. मात्र हा नगरसेवक आणि प्रकरणातील आणखी एक जण फरार आहेत. जागेच्या वादातून हा खून झाल्याचं समजतं. शहाबाजार येथील २ एकर ३२ गुंठे जागेवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याबाबत दोन्ही गटांनी जिन्सी पोलिस ठाण्यात परस्परांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या आहेत.

 

तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शौकत, लियाकत आणि मुजीब खान यांना अटक केली असून नगरसेवक शहानवाज खान आणि अमजद खान यांचा शोध सुरू आहे.