रेल्वे एक्सप्रेसवर दरोडा, जवान सरसावला पुढे

निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसवर ३ ते ४ जणांच्या टोळीनं दरोडा घातल्याची घटना घडली आहे. काल रात्री १ ते २ च्या दरम्यान ही दरोड्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजजवळ नांद्रेगावात गाडी सिग्नलला थांबली असताना चोरट्यांनी धाडसी दरो़डा घातला.

Updated: Apr 23, 2012, 07:48 AM IST

www.24taas.com, नांदेड

निझामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसवर ३ ते ४ जणांच्या टोळीनं दरोडा घातल्याची घटना घडली आहे. काल रात्री १ ते २ च्या दरम्यान ही दरोड्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरजजवळ नांद्रेगावात गाडी सिग्नलला थांबली असताना चोरट्यांनी धाडसी दरो़डा घातला.

दरोडेखोरांनी गाडीतल्या प्रवाशांवर पिस्तूल रोखून तसंच चाकूचा धाक दाखवून धमकावत एका महिलेकडील मंगळसूत्र तसंच काही प्रवाशांकडून रोख रक्कम लुटून नेली आहे. दरोडेखोर प्रवाशांना धमकावत असताना, गाडीतील आर्मीच्या जवानाने पुढे सरसावून दरोडेखोरांना प्रतिकार केला. मात्र दरोडेखोरांनी त्याला जबर मारहाण केली, यामध्ये प्रतिकार करणारा आर्मीचा जवान चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला.

त्याचावर चाकूने वार करण्यात आले आहेत. त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. झाकीर मुलानीवर असं जखमी जवानाचं नाव आहे. या धाडसी दरोड्यांने रेल्वे सुरक्षेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा नसल्याने अशा प्रकारचे दरोडे रेल्वेवर पडतात.